दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ऑमिक्रॉनमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारसह स्थानिक प्रशासनाकडूनही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात रहावा, यासाठी कोरोना लस घेण्यासाठी विविध योजना, मोहीम राबविल्या जात आहे. अशातच नागपूर जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे.
अशी आहे नियमावली
नागपूर जिल्हा प्रशासनाने सुदधा खबरदारी म्हणून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी काही नियमावली निश्चित केली आहे. या नव्या नियमावलीमुळे कर्मचाऱ्यांचे पगार रोखलेत. प्रशासनाने ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असेल तरच त्यांना पगार देण्यात येतील, असा फतवा काढला आहे. त्यामुळे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येताच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे.
लसीकरण पूर्ण करा अन्यथा पगार रोखणार!
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली नाही म्हणून त्यांचे पगार रोखले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी धावपळ करायला सुरुवात केली आहे. १५ दिवसाआधीच नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करा अन्यथा पगार रोखला जाईल, अशा सूचना केल्या होत्या. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ३०० हून अधिककर्मचारी आहे. त्यापैकी ११ कर्मचाऱ्यांनी लसीकरण न केल्याने त्यांचे पगार रोखले आहेत.
(हेही वाचा – आजही जनतेचा मोदींवरच विश्वास! पवार-बॅनर्जी भेटीवर काय…)
नवे आदेश जारी
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची सद्यास्थिती लक्षात घेता नवे आदेश जारी केले आहेत. यामध्ये युनिव्हर्सल पास असणाऱ्यांना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे तर मॉलपासून बाजारापर्यंत, सार्वजनिक प्रवासी यंत्रणेचा प्रवासी वापर, सर्व आस्थापनावरील भेटी, नागपूर जिल्ह्यात प्रवेश यासाठी संपूर्ण लसीकरण बंधनकारक असणार आहे.
Join Our WhatsApp Community