कोरोना विषाणूच्या ओमायक्राॅन प्रकाराचा संसर्ग वाढल्याने सांगली महापालिका प्रशासनाने त्याचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सहा रुग्णालये राखीव ठेवली आहेत. राज्य सरकारने याविषयी सूचना पाठवल्या असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
कोरोनाच्या तयारीविषयी महापालिकेची बैठक झाली. या वेळी या बैठकीत महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक डाॅ. किरण देशमुख, नगरसेवक विनायक विटकर, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. अरुंधती हराळकर यांच्यासह सर्व आरोग्य विभागाचे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(हेही वाचा अजित पवारांनी आमदारांना दिले शिस्तीचे धडे! म्हणाले, मुख्यमंत्र्यांची तरी खूर्ची सोडा!)
‘ओमायक्राॅन’ची लागण झालेल्यांसाठी स्वतंत्र विभाग
महापालिकेने बॉइस प्रसूतिगृह, काडादी हाॅस्पिटल, राज्य कामगार विमा हाॅस्पिटल, रेल्वे हाॅस्पिटल, वाडिया हाॅस्पिटल, पाेलिस ट्रेनिंग सेंटर दवाखाना राखीव ठेवले आहेत. या दवाखान्यात ऑक्सिजनची सोय केली आहे. कोविड रुग्णांना क्वाॅरंटाइन करण्यासाठी हे दवाखाने वापरण्यात येणार आहेत. तसेच ‘ओमायक्राॅन’ची लागण झालेल्यांसाठी स्वतंत्र विभाग असेल. ओमायक्राॅन चाचणी अहवाल येण्यासाठी चार दिवस लागतात. जनजागृतीसाठी फलक लावण्यात येतील. घंटागाड्यांचाही वापर केला जाईल. सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे. रुग्ण संख्या वाढत चालली आहे.
Join Our WhatsApp Community