सैन्याची परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये संताप! ट्विटरवर #JusticeForArmyStudents ट्रेंड होतोय

97

केंद्र सरकारने रेल्वे भरतीची परीक्षा रद्द केल्यानंतर सैन्य भरतीची परीक्षा कधी घेणार अशी विचारणा आता देशभरातील युवक करत आहेत, त्यासाठी ट्विटरवर #JusticeForArmyStudents हा ट्रेंड सुरु झाला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

देशभरातील तरुणांमध्ये नाराजी उमटली

सध्या देशात नोकरीविषयक अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. कोरोनाच्या कारणामुळे रेल्वे भरतीची परीक्षा रखडली आहे. केंद्रीय विभागाच्या नोक-यांसाठी मोदी सरकार विशेष प्रयत्न करत नाही. त्यातच आता सैन्य भरतीचीही परीक्षा रखडली आहे. त्यामुळे देशभरातील तरुणांमध्ये नाराजी उमटली आहे. आधीच वय निघून जात आहे. अशा वेळी सैन्य भरतीची परीक्षा अधिक काळ न टाळता शक्य तितक्या लवकर ही परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.  ट्वीटरवर याविषयीचा ट्रेंड देखील ट्रेंडींग होत आहे. त्यामध्ये अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

(हेही वाचा श्रीमलंग गडाच्या बाजूचा पहाडेश्वर पर्वतही मुसलमानांच्या ताब्यात! वन विभागाची भूमिका संशयास्पद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.