माहीम येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे येथील उपकेंद्रातून ज्या ज्या भागात वीज पुरवठा केला जातो, त्या दादर परिसरात रविवारी, २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास तब्बल पाऊण तास वीज गायब झाली होती, विशेष म्हणजे आदल्या दिवशीही दादर परिसरात वीज गेली होती.
दादरकरांना भारनियमनाचा अनुभव
सध्या राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाचा कमालीचा तुटवडा निर्माण झाल्याने आतापासून राज्यात भारनियमन सुरु झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज खंडित केली जात आहेत. परंतु मुंबईत शहरात भारनियमन केले जात नाही. परंतु तरीही तांत्रिक कारणामुळे दादर येथील शिवाजी पार्कसह संपूर्ण दादर पश्चिम परिसरात वीज गेली. आधीच उकाड्याने सर्वसामान्यांचे जीवन खडतर झाले असताना त्यातच वीज गेल्याने दादरकरांनी काही काळ ग्रामीण भागातील भारनियमनाचा अनुभव घ्यावा लागला.
(हेही वाचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दौऱ्यात गैरहजर! आतापर्यंत किती वेळा पंतप्रधानांना टाळले?)