खरीप हंगामात भाताची लागवड कमी झाल्याने तांदळाचे उत्पादन तब्बल 60 ते 70 टनांनी कमी राहण्याची भीती आहे. यामुळे तांदळाच्या किमती पुन्हा एकदा वाढणार आहेत. मागच्या तीन महिन्यांपासून घसरत असलेला किरकोळ महागाईचा दर वाढला आहे.
खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन होणार कमी
2021-22 मध्ये भारताचे तांदूळ उत्पादन 13.029 कोटी टन होते. जे एका वर्षांपूर्वी 12.437 कोटी टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन 60-70 लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
( हेही वाचा: Patra Chawl Case: ईडीकडून ४ हजार पानी आरोपपत्र दाखल, संजय राऊतच दोषी )
जगभरात वाढल्या तांदळाच्या किमती
भारताकडून निर्यातबंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमतीत प्रति टन 35 डाॅलरपर्यंत वाढ झाली आहे. 20 टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे 59 लाख टन तांदूळ भारताबाहेर जाणार नाही. यामुळे 2022-23 मध्ये देशातून होणारी तांदूळ निर्यात 25 टक्के कमी होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community