लसीकरण ‘अ‍ॅप’टले!

मागील आठवड्यात लशींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर महापालिकेला लशीचा साठा उपलब्ध झाला, पण आता लसीकरणासाठी ज्या कोवीन अ‍ॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असते, त्यामध्येच अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

77

सरकार आणि महापालिकेने आवाहन केल्यानंतर मुंबईमध्ये लसीकरणासाठी नागरीकांनी पुढे यावे असे आवाहन सर्व नगरसेवक रस्त्यांवर उतरुन लसीकरणासाठी धावपळ करू लागले आहेत. कुणी मोबाईल अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंद करत आहेत, तर कुणी लसीकरणासाठी नागरीकांना खासगी वाहनाद्वारे केंद्रात  घेवून जात आहे. पण ही सर्व धावपळ सुरु असली तरी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रांवरच नागरीकांची प्रचंड गर्दी वाढू  लागलेली आणि दुसरीकडे अ‍ॅपवरच नोंदणी होत नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही त्रेधातिरपीट उडालेली आहे. त्यामुळे लसीकरण ‘अ‍ॅप’टल्याने नोंदणीवर आणि लोकांना केंद्रावर परिस्थिती हाताळताना नगरसेवकांची नाकीनऊ होत आहे.

नोंदणीसाठी नागरीकांची धावपळ!

मुंबईसह देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईत सुरुवातीला फ्रंट लाईन व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात केली. परंतु त्यानंतर ४५ वर्षांवरील सहव्याधी रुग्णांसह ज्येष्ठ नागरीकांना ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ही लस ४५ वर्षांवरील सर्वांनाच दिली जात आाहे. याबाबत देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला आवाहन करत लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर खुद्द महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मागील आठवड्यात सर्व नगरसेवकांना लसीकरण मोहिमेमध्ये आपले सहकार्य राहावे, अशी विनंती केली. त्यानंतर भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक पातळीवर नागरीकांची नोंदणी अ‍ॅपवर करून देत त्यांना लसीकरणासाठी मदत करत आहे.

(हेही वाचा : नालेसफाईचे काम ३५ टक्के पूर्ण, यंदा प्रथमच शिल्ट पुशर अँड ट्रक्सॉर मशीनचा वापर)

नागरीकांची नोंदणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले!

वांद्रे पूर्व ते खार पूर्व भागातील माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, चंद्रशेखर वायंगणकर, साकीनाका येथील शिवसेना नगरसेवक किरण लांडगे, शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र जनावळे, माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यासह अनेकांनी शाखांमधून नोंदणी करून ज्येष्ठांना खासगी वाहनांमधून केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्थाा करून दिली होती. तर भांडुप-कांजूरच्या भाजप नगरसेविका सारीका मंगेश पवार यांनी आपल्या कार्यालयातच  नागरीकांची लसीकरणाची नोंदणी करून देण्यास प्रारंभ केला. ४५ वर्षांवरील नागरीकांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम सारीका पवार यांच्या कार्यालयात लसीकरणाच्या अॅपवर नोंदणीला सुरुवात करून नागरीकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर दादरमधील शिवसेना नगरसेविका व सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या कार्यालयातून लसीकरणासाठी अ‍ॅपवर नोंदणीची मोहिम राबवण्यात आली असून आता मुंबईतील सर्वच नगरसेवकांच्या कार्यालयांमधून ही अ‍ॅपवर नोंदणी केली जात आहे.

आता लशीचा साठा झाला, पण अ‍ॅप बिघडले!

मात्र, मागील आठवड्यात लशींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर पुन्हा महापालिकेला लशीचा साठा उपलब्ध झाला. त्यानंतर लसीकरण केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी होवून लागली असून एका बाजुला नोंदणी केलेले नागरीक आणि दुसरीकडे नोंदणी न करता तिथे गर्दी करणारे नागरीक यामुळे मोठ्याप्रमाणात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे. मात्र, शुक्रवारपासून या अॅपवर नोंदणीच होत नसल्याने नागरीकांना आपले नाव नोंदवता येत नाही. त्यामुळे अनेक कार्यालयांमध्येही नोंदणीसाठी गर्दी होत आहे. लसीकरणाच्या उपलब्ध साठयाच्या तुलनेते अधिकप्रमाणात नोंदणी झाल्याने अॅपवरील नोंदणी थांबवली की ही बाब तांत्रिक आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.