नागपुरातील Ambazari Bridge पाडल्याने ‘या’ परिसरात मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

64
नागपुरातील Ambazari Bridge पाडल्याने 'या' परिसरात मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

अंबाझरी (Ambazari Bridge) टी पॉईन्ट ते विवेकानंद स्मारक हा रस्ता पुलाच्या बांधकामासाठी बंद केल्याने शंकरनगर चौक, एलएडी चौक, अभ्यंकरनगर चौक, माटे चौक, बजाजनगर, सुभाषनगर आणि अंबाझरी धरणाच्या आसपासच्या परिसरात वाहतुकींची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे दक्षिण-पश्चिम नागपुरातील चारही बाजूच्या मार्गांवर नागरिकांची तासनतास वाहनकोंडीत अडकून पडू लागले आहे. वाहतूक पोलीसही कोंडी दूर करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत आहेत.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अंबाझरी परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी अंबाझरी तलावापुढील पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आधी अंबाझरी टी -पाईंट ते विवेकानंद स्मारक या दरम्यान एकेरी मार्ग बंद करण्यात आला; परंतु मंगळवार, ११ जूनपासून दोन्ही मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे हिंगण्याकडून माटे चौकाकडे जाणारा, माटे चौक ते अभ्यंकरनगर आणि अभ्यंकरनगर ते गांधीनगर या मार्गावर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे लक्ष्मी नगरातून प्रताप नगर, हिंगणा, नेल्को सोसायटी, त्रिमूर्ती नगर परिसरात जाणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे.

(हेही वाचा – Ayodhya Raam Mandir परिसरात पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर )

खाद्यपदार्थांच्या दुकानांचा अडथळा
माटे चौक ते आयटी पार्क रस्त्यावरील खाद्यपदार्थांची दुकाने पुटपाथवरून थेट रस्त्यावर आली आहेत. पुलाच्या बांधकामामुळे परिसरात आधीच वाहतुकीची कोंडी असताना रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांनी अडचणीत मोठी भर घातली. या दुकानांवरील ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी आधी हे अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. तसे न केल्यास वाढलेल्या वाहतूककोंडीमुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे.

प्रवासी वैतागले
सकाळी आणि सायंकाळनंतर विविध शासकीय व खासगी कार्यालयातील चाकरमाने कार्यालय अथवा घराकडे जात असताना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. विशेषत: बसने जाणाऱ्या प्रवाशांना तासनतास थांबावे लागल्यामुळे ते संताप व्यक्त करीत आहेत. पुढील अनेक महिने हा त्रास सहन करावा लागणार, अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.