Fire : फिल्म सिटीजवळील ‘त्या’ आगीमुळे गोरेगावमधील अनधिकृत बांधकामे ऐरणीवर

महापालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून कारवाई ऐवजी दिले जाते संरक्षण

789
Fire : फिल्म सिटीजवळील 'त्या' आगीमुळे गोरेगावमधील अनधिकृत बांधकामे ऐरणीवर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

आरे कॉलनीतील फिल्म सिटी परिसरात बुधवारी लागलेल्या आगीच्या (Fire) घटनेला मुख्य कारण काय याचा तपास सुरु असला तरी येथील फिल्म सिटीमधील सेटचे सामान आणि जुने लाकडी सामान ठेवण्याच्या गोदामच याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या संतोष नगर परिसरात मागील काही महिन्यांपासून अनधिकृत लाकडांचे गोदाम बनले जात असताना महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने गोदामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील काही महिन्यांमध्ये पी दक्षिण विभागांमध्ये अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचे प्रमाण वाढलेले असतानाही महापालिकेचे अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, त्यामुळे आयुक्त पी दक्षिण विभागाकडे महापालिका आयुक्त कधी लक्ष घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर, फिल्म सिटी प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी सायंकाळी सात वाजता आगीची (Fire) दुर्घटना घडली. ही आग येथील झोपड्यांमध्ये पसरुन मोठे नुकसान झाल्याने येथील २०० ते २५० नागरिकांचे तात्पुरत्या स्वरुपात येथील गोकुळधार महापालिका शाळेत पुनर्वसन करून पी दक्षिण विभागाच्यावतीने जेवण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. संतोष नगरमधील संत निरंकारी मार्गावर मागील काही महिन्यांपासून अनधिकृत झोपड्या तसेच लाकूड आणि चित्रीकरणाच्या सेटचे टाकावू लाकडी सामानांची गोदामे बनवण्यात आली आहेत. यासर्व अनधिकृत तसेच अतिक्रमणांवर महापालिकेच्या पी दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांचे लक्ष दिसून येत आहे.

(हेही वाचा – Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ‘अभिजात मराठी’ चा जयघोष; ग्रंथदिंडीने दिल्लीकर मंत्रमुग्ध)

झोपड्यांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली असली तरी या झोपड्यांना संरक्षण कुणाचे असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून केले जात आहे. तसेच लाकडांची अनधिकृत गोदामे बनवली जात असतानाही तिथे कुठलीही अग्निसुरक्षेची उपाययोजना राखण्याची दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे या आगीच्या (Fire) दुर्घटनेमुळे महापालिकेचे अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता उघड झाली आहे. गोकूळधाम मधील नागरिक सातत्याने येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करत असतानाही महापालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांना संरक्षण देत असल्याने पी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांवरच येथील जनता नाराज आहे.

झोपड्यांना लागलेली आग (Fire) ही लाकडाच्या गोदामामुळे अधिक भडकली गेली, त्यामुळे जर या गोदामांवर कारवाई झाली असती तर आग ही मोठ्याप्रमाणात भडकली नसतील असेही प्रत्यक्षदर्शी लोकांचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या म्हणण्यानुसारही येथील गोदामतील लाकडी सामान आणि त्यातील सिलिंडरमुळे ही आग भडकली असावी, असा अंदाज आहे. चित्रीकरणासाठी जे सेट बनवले जातात, त्यांना रंग मारला जातो आणि या रंगाच्या रासायनामुळे या लाकडी सामानांनी अधिक पेट घेतला असावा असेही बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.