राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? काय आहे कारण…

77

भारतात सध्या कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्र कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहे. अनेक रुग्ण हे उपचाराधीन आहेत. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात दिवसाला 270 ते 300 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज लागत होती. मात्र सध्या दिवसाला 424 मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही, हे स्पष्ट केले आहे. हे पाहता आणि सध्या राज्याची वाढत असलेली ऑक्सिजनची मागणी पाहता राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असे चित्र आहे.

मात्र ऑक्सिजनची ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याकडे मुबलक साठा आहे, त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता वा टंचाई भासणार नाही. तसेच, पहिल्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केला आहे. तरी देखील  ऑक्सिजनची अशीच मागणी वाढत गेली तर मात्र टंचाई भासणार आहे.

मागणीच्या तुलनेत निर्मिती कमी 

पहिल्या आणि दुस-या लाटेदरम्यान, उपचाराधीन असणा-या 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली होती. पहिल्या लाटेत दिवसाला 850 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजन लागत होता, नंतर त्याची मागणी वाढून दीड हजार मेट्रीक टनपर्यंत पोहोचली. पण, या मागण्यांच्या तुलनेत ऑक्सिजनची निर्मिती कमी होत असल्याने पहिल्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. एप्रिल 2021 मध्ये दुस-या लाटेदरम्यान, दिवसाला 1 हजार 600 ते 1 हजार 800 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता. नंतर मात्र ऑक्सिजनची मागणी कमी कमी होत गेली.

( हेही वाचा :आधी पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट, आता संघाच्या मुख्यालयाची रेकी! यंत्रणा सतर्क) 

म्हणून वाढतेय मागणी 

याआधी 10 टक्के उपचाराधीन असणा-या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती, पण आता मात्र केवळ 2 टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. मात्र असे असले तरी मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपचाराधीन असणा-या रुग्णांना ऑक्सिजनची गरज वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिली, रूग्ण संख्या वाढत. राहिली तर मात्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होवून लॉकडाऊन लावण्याची गरज निर्माण होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.