रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांना सध्या झटपट उपलब्ध होणा-या सेवा, वाहतूक कोंडी, चालकांचे विभागलेले उत्पन्न, नुसताच परवाना घेऊन ठेवणे इत्यादींमुळे रिक्षा परवानावाटपावर परिवहन विभागाने मर्यादा आणण्याचा विचार केला आहे. यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अहवालही सादर केला असून यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
या शहरांत परवाना वाटप होणार नाही
5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात परवाना वाटप होणार नाही, असे प्रस्तावात नमूद आहे. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्हा्यातील रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणावी, असे आदेश केंद्र सरकारने नोव्हेंबर 1997 मध्ये दिले होते. त्यानुसार, ठराविक मर्यादेबाहेर परवाने जारी होणार नाहीत, अशी तजवीज राज्य शासनाने केली होती. त्यामुळे परवानावाटपच बंद झाल्याने रिक्षांबरोबरच टॅक्सींची संख्याही मर्यादित राहिली होती. परंतु, वाढत जाणारे चालकांचे उत्पन्न विभागले गेले आणि अनेकांना उत्पन्नही मिळू लागले.
( हेही वाचा: पाणीपट्टीत सहा ते सात टक्के होणार वाढ ? )
राज्यातील संख्या किती
राज्यात सध्या सुमारे 10 लाखांहून अधिक रिक्षा आहेत. मुंबईतील संख्या आता दोन लाखांहून अधिक आहे, तर मुंबई महानगरातही सव्वातीन लाखांपर्यंत रिक्षा आहेत, अशी माहिती रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.
Join Our WhatsApp Community