Malabar Hill Reservoir : शहर भागातील जनतेला पाणी उकळून आणि गाळून प्यावे लागणार!

या काळात जलाशयाचा कप्पा रिक्त करण्यात आल्याने शहर विभागात काही परिसरात पाणीकपात तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

1510
Malabar Hill Reservoir : शहर भागातील जनतेला पाणी उकळून आणि गाळून प्यावे लागणार!
Malabar Hill Reservoir : शहर भागातील जनतेला पाणी उकळून आणि गाळून प्यावे लागणार!

मलबार हिल जलाशय (Malabar Hill Reservoir)  पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समितीमार्फत गुरुवारी ७ डिसेंबर २०२३ रोजी अंतर्गत पाहणी करण्यात आली. या काळात जलाशयाचा कप्पा रिक्त करण्यात आल्याने शहर विभागात काही परिसरात पाणीकपात तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामध्ये ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागांचा समावेश होता. जलाशयातील कप्पा पूर्ण रिक्त करुन पुन्हा भरण्यात आला असून काही विभागातील नागरिकांना एक दिवसासाठी अर्थात २४ तास गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती मुबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. v

मुंबई महानगरपालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाची (Malabar Hill Reservoir) पुनर्बांधणी विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ अ आणि २ ब ची गुरुवारी ७ डिसेंबर २०२३ रोजीअंतर्गत पाहणी केली. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करण्यात आला होता. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. (Malabar Hill Reservoir)

(हेही वाचा – Abhimanyu Easwaran : बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनची मनिषा लवकरात लवकर भारतीय जर्सी परिधान करण्याची)

या तज्ज्ञ समितीने गुरुवारी ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत जलाशयाची अंतर्गत पाहणी केली. उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांच्यासह अभियंता आणि नागरिकांचे प्रतिनिधी डॉ. वासुदेव नोरी, अभियंता आणि नागरिकांच्या प्रतिनिधी अल्पा सेठ, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक आर. एस. जांगीद, प्राध्यापक ज्योती प्रकाश, प्राध्यापक दसका मूर्ती आदी तज्ज्ञांची उपस्थिती होती. तज्ज्ञ समितीच्या भेटीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला असून आगामी दिवसात जलाशयाच्या उर्वरीत भागाची पाहणी करण्याचे विचाराधीन आहे. (Malabar Hill Reservoir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.