उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा नेस्को गोरेगाव येथे मेळावा घेण्यात आला होता. हा मेळावा कार्यालयीन दिवशी आणि कार्यालयीन वेळेत अर्थात सायंकाळी ७-८ वाजताच्या दरम्यान झाला, त्यावेळी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले होते. चुकीच्या दिवशी आणि चुकीच्या वेळी असे मोठे कार्यक्रम घेतल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतात याचा प्रत्येय पुन्हा आला. कार्यालये सुटण्याच्या वेळेत हा मेळावा संपल्यामुळे मोठ्या प्रमाणात मेळाव्यासाठी जमलेली गर्दी आणि वाहने एकाच वेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर आली. परिणामी या महामार्गावर दररोजच्या तुलनेत प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. ही वाहतूक कोंडी चक्क गोरेगावपासून सांताक्रूझपर्यंत होती, तर दुसऱ्या बाजूने गोरेगावपासून बोरिवलीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मोठ्या संख्येने वाहने महामार्गावर अडकून पडली होती. त्यामुळे नाईलाजाने अनेकांना द्रुतगती महामार्ग सोडून एस.व्ही रोड पकडला.

(हेही वाचा ‘हिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिका निवडणुका घेऊन दाखवा’,उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here