दुर्ग मित्र परिवार, नेरुळ, नवी मुंबई यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३१ डिसेंबर रोजी आगळी वेगळी ५ वी रायगड मोहिम अतिशय शिस्तबद्धरित्या पूर्ण केली.
या रायगड मोहिमेत १ वर्षाच्या चिमुकलीसह अनेक लहान मुले- मुली सहभागी झाले होते. त्यातील लहानग्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.
राज्यभरातून उपस्थिती
रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावात हर्ष कालेकर समुहाने अतिशय सुंदर मराठी गीतांचे सादरीकरण केले. तसेच प्रसिद्ध शाहिर गणेश ताम्हाणे यांनी पोवाडे गायले. रायगड किल्ल्यावर प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर विनोद बाबर आकाश घोरडे व यशवंतराव नवनीत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची व्याखाने सादर केली. तसेच, मानसी निखील सणस उटीकर हिने दुर्ग मित्र परिवाराचा मुख्य हेतू, ध्येय व करीत असलेल्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुंबई, सातारा, पुणे, ठाणे, कोल्हापूर, इत्यादी ठिकाणांहून लोक सहभागी झाले होते.
( हेही वाचा: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; मंदिर प्रशासनाची माहिती )
२२५ सदस्यांनी घेतला सहभाग
या मोहिमेत १ वर्षाच्या चिमुकल्यापासून ७३ वर्षांच्या वृद्धापर्यंत लोक सहभागी झाले होते. एकूण २२५ सदस्यांनी सहभाग घेतला होता. दुर्ग मित्र परिवारातील स्वप्नील घोलप यांच्या नेतृत्वाखाली अभिजीत भोसले, सचिन गुंजाल, विशाल कुतल, तनुजा कुतल, मानसी निखील सणस-उटीकर, अर्चना झेंडे, हर्ष कालेकर, प्रफुल्ल दळवी, विनायक घोलप, मधुसूदन सोलंके, मीनाक्षी मोहिते, निलम घोलप, प्रदीप यादव या कार्यकारिणी समितीने रायगड वारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.