दुर्गा पूजा २०२४ मध्ये ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाणार आहे. ही भारतीय उपखंडातील विशेषत पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि बिहारमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दुर्गा पूजेला देवी दुर्गेच्या विजयाचे आणि महिषासुराच्या विनाशाचे स्मरण केले जाते. (durga puja 2024)
दुर्गा पूजेच्या खास दिवसांचे महत्त्व
महाष्टमी (११ ऑक्टोबर २०२४):
महाष्टमी हा दुर्गा पूजेतील एक महत्त्वाचा दिवस आहे. यावेळी विशेष पूजा आणि यज्ञ केले जातात. या दिवशी भक्त देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.
(हेही वाचा – Navratri Festival : नवरात्रोत्सव म्हणजे काय आणि का साजरा केला जातो?)
विजयादशमी (१३ ऑक्टोबर २०२४):
विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवा देवी दुर्गेच्या विजयाचा आणि जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचा दिवस आहे. या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाते. (durga puja 2024)
दुर्गा पूजेची तयारी
दुर्गा पूजेच्या तयारीत भक्तगण मोठ्या उत्साहाने भाग घेतात. देवी दुर्गेची भव्य मूर्ती बनवण्यापासून ते मंडप सजवण्यापर्यंत अनेक उपक्रम राबवले जातात. २०२४ मध्येही दुर्गा पूजा पूर्वीप्रमाणेच उत्साहात आणि श्रद्धेने साजरी होईल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community