Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा

154
Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा
Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा

ठाण्याला लागूनच असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ही मशीद नसून ते देवीचे मंदिर आहे, असा स्पष्ट निर्वाळा १० डिसेंबर या दिवशी दिला. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल हाती आला आहे. वर्ष १९७१ मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे दुर्गाडी (Durgadi Fort) हे देवीचे मंदिर कि मशीद यावरून सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर ९० च्या दशकात स्वर्गीय आनंद दिघे यांनी येथील मशि‍दीला विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केले होते.

(हेही वाचा – bcom colleges in mumbai : मुंबईतील सर्वोत्कृष्ट bcom colleges कोणती आहेत?)

या प्रदीर्घ लढ्याला आता यश आले असून कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी केले आहेत. न्यायालयाने या किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत केला जल्लोष साजरा केला.

हिंदुत्वनिष्ठांच्या सातत्यपूर्ण आंदोलनाला यश

गेल्या अनेक वर्षांमध्ये या मंदिरावर मुसलमानांनी अतिक्रमण केले असून बकरी ईद दिवशी नमाजपठणही चालू केले होते. त्याच बरोबर ते मुळात हिंदूंचेच मंदिर असूनही हिंदूंना तेथे जाण्यास विरोध केला होता. पोलीस प्रशासनही अशा वेळी हिंदूंना नमते घ्यायला लावून हिंदूंचे मंदिर बंद ठेवण्यास भाग पाडत असत. हे मंदिर असून ईदच्या कारणाने ते बंद ठेवू नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलने करायच्या. या वर्षीही जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात आल्यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उबाठा गट अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले होते. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशीही भूमिका घेतली होती. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर ही परिस्थिती बदलेल आणि मंदिरावरील हे इस्लामी अतिक्रमण नष्ट होण्याच्या दृष्टीने प्रशासन पावले उचलेल, अशी अपेक्षा हिंदू व्यक्त करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.