कोरोना काळात दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात देण्यात आलेली सवलत रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. ही सवलत आता पुन्हा सुरु करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.
सरकारचे म्हणणे आहे की, बहुतांश श्रेणीतील रेल्वे भाडे आधीच कमी आहे. सर्व प्रवाशांसाठी प्रवास खर्चाचा 50 टक्के भार रेल्वे पूर्वीपासून घेत आहे. कोरोनामुळे 2020 ते 2021 मध्ये खूप कमी प्रवाशांनी प्रवास केला. 2019-20 च्या दरम्यान, सरकारच्या आवाहनानंतर, 22 करोड 62 लाख ज्येष्ठ नागरिकांनी सवलत योजना स्वत:हून सोडून दिली.
( हेही वाचा: राहुल शेवाळेंची गटनेतेपदी नियुक्ती हा शिवसेनेवर अन्याय, सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद- विनायक राऊत )
ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना सूट नाहीच
सरकारने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना सवलतीचे नियम पूर्वीसारखेच असतील. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू यांना भाड्यात पुन्हा सूट देण्यात येणार नाही.
सवलतीमुळे 5 हजार कोटींचा फटका
2017-2018 च्या दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीमुळे रेल्वेला 1 हजार 491 कोटींचा तोटा झाला. हा तोटा पुढील वर्षी वाढून 1 हजार 636 कोटी झाला आणि 2019-20 मध्ये 1 हजार 667 कोटी झाला – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव