NeoGrowth च्या अहवालानुसार देशातील प्रत्येक १० पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) यंदाच्या वर्षात नफ्यात राहणार आहेत. ग्राहकांची मजबूत मागणी आणि व्यवसाय करणे सुलभतेमुळे हे व्यवसाय नफ्यात राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यांना सरकारी योजनांचा लाभ झाला आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी दिली आहे.
अहवालात म्हटले आहे की, 60 टक्के MSME ने गेल्या वर्षी त्यांचे व्यवसाय लक्ष्य पूर्ण केले. सर्व क्षेत्रांमध्ये, 2024 मध्ये दहापैकी सहा व्यवसायांना कर्जाची गरज भासेल. घाऊक किंवा व्यावसायिक सेवा क्षेत्राला कर्जाची सर्वाधिक मागणी असेल. दरम्यान, अहवालात म्हटले आहे की 44 टक्के MSME अधिक कर्मचारी नियुक्त करू शकतात, तर 18 टक्के हेडकॉउंट कमी करू शकतात. NeoGrowth ने 25 शहरांमधील 3,000 व्यवसाय मालकांचे सर्वेक्षण केले. भारताचे छोटे व्यवसाय केंद्रस्थानी राहतील आणि त्यांच्या वाटचालिचा एक भाग बनून आम्हाला आनंद होत आहे, असे NeoGrowth चे मुख्य व्यवस्थापक अरुण नय्यर म्हणाले.
(हेही वाचा DCM Devendra Fadnavis : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसायची आहे)
Join Our WhatsApp Community