Dussehra 2024: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पान समजून, ग्राहकांनी बाजारात कांचनची पाने लुटली

1052
Dussehra 2024: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पान समजून, ग्राहकांनी बाजारात कांचनची पाने लुटली
Dussehra 2024: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पान समजून, ग्राहकांनी बाजारात कांचनची पाने लुटली
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

सोन्यासारखी भावंडं म्हणून ज्या झाडांची ओळख आहे ते म्हणजे आपट्याचे आणि कांचनचे झाड. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्यासाठी आपट्याच्या पानाची देवाण घेवाण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. परंतु सध्या आपट्याच्या पानांची पारखच नसल्याने अनेक महिलांनी विक्रीकरता कांचनची पाने तोडून आणली आणि मुंबईकरांनी आपट्याच्या छोट्या आकाराच्या झाडांपेक्षा मोठ्या आकाराची आणि चांगली दिसणारी ही पानांची जुडी खरेदीही केली. त्यामुळे अनेकांनी याच देवाण घेवाण करून कांजनची पाने देत सोने म्हणून त्यांची दसऱ्याचा सण साजरा केला. (Dussehra 2024)

सध्या मुंबईतील अनेक रस्त्यांवर तसेच अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात कांचनची झाडे लावण्यात आल आहे. या झाडाला विविध रंगाची आकर्षक फुले येत असल्याने मनाला प्रसन्न करणारी ही झाडे परिसराला सुशोभित तर करताच, शिवाय त्या झाडांना पाहून मन प्रफुल्लितही होते. पावसाळ्या ही झाडे चांगल्या प्रकारे बहरली जातात. रस्त्यांच्या कडेला पदपथावर असणारी ही झाडे फुलांनी बहरल्याने अधिक आकर्षक मनमोहक दिसतात. कांचन आणि आपटे ही एकसारखी दिसणारी झाडे आहेत. त्यांना सोन्यासारखी भावंडे असेही म्हटले जाते. परंतु आपट्याची पाने व कांचनची पाने एकसारखी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती वेगवेगळी आहेत.

(हेही वाचा – Haryana CM Oath Ceremony : ठरलं तर… हरियाणामध्ये ‘या’ दिवशी होणार मुख्यमंत्री पदाची शपथ )

दसरा निमित्त दादरमध्ये मागील दोन दिवसांपासून आपट्याची पाने विक्रीला आली आहेत. यात विक्रील आणलेल्या आपट्यांच्या पानांसोबत कांचनच्या झाडांच्या पानांची विक्रीला आणली होती. यात ज्या व्यक्तीला आपट्यांच्या पानांची जाण नाही,त्यांनी या कांचनच्या पानांची खरेदी करून त्याची पुजा केली तसेच ती पाने सोने म्हणूनही वाटली.

मागील दोन वर्षांपूर्वी दसऱ्याला दादर भागातील एल जे रोड, सावरकर मार्ग तसेच अन्य भागातील कांचनच्या झाडांची पाने ही ओरबडून या झाडांच्या फांद्या बोडक्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता या झाडांच्या पानाची पारख नसल्याने तसेच लोकांकडून याची खरेदी केली जात असल्याने आदिवासी महिलांकडून या झाडांच्या फांद्या तोडून आणून त्याची विक्री केली. (Dussehra 2024)

(हेही वाचा – IOC Withholds IOA Fund : आंतरराष्ट्रीय परिषदेनं भारताचा निधी रोखला)

बॉक्स

आपट्याची पाने लहानशी, खरखरीत, गोलाकार अशी असतात. हे झाड डोंगराळ, शुष्क प्रदेशात सापडते. एवढी वर्षे या झाडांची पाने ओरबडल्याने ती झाडे मृत पावून त्यांची संख्या कमी झाली आहे. हे झाड आता सहज सापडेनासे झाले आहे. तर यावर उपाय म्हणून शहरांच्या सुशोभिकरणासाठी बागांमध्ये व रस्त्यांच्या कडेला कांचनवृक्षींची लावलेली आहेत. ही पाने आपट्यासारखीच दिसतात. केवळ त्यांची टोके निमुळती आणि पोत खरखरीत नसून नाजुक, मऊ असतो.

कांचन झाडाचे वैशिष्ट्ये

हे झाडे मुळचे भारतातील असून शोभेकरता त्याची लागवड केली जाते. हे झाड १० ते १२ फुट उंच वाढते. पाने साधी, १० ते १२ सेंमी. लांब व रुंद असून आपट्याच्या पानांसारखी दोन भागांमध्ये विभागलेली असतात. फुले मोठी व सुवासिक असतात. ती फांदीच्या टोकाला झुबक्यात येतात. ती गडद,गुलाबी किंवा पांढरी असतात. शेंग १५ ते ३० सेंमी. लांब असून त्यात १० ते १५ चपट्या बिया असतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.