दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) ११ एप्रिलच्या रात्री खराब हवामानामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली. अचानक घोंगावणारे वारे आणि धुळीच्या वादळाने विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला. (Delhi Air Traffic) परिणामी, ३५० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. (Chaos At Delhi Airport)
इंडिगोने (indigo) यासंदर्भात निवेदन करतांना, हवाई वाहतूक विमानांच्या गर्दीमुळे विस्कळीत झाल्याचे नमूद केले. दिल्लीतून विमान उड्डाण आणि विमाने उतरण्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट करून केवळ तीन रन-वे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
(हेही वाचा – स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षी भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचे विधान)
विमानांच्या उड्डाणांवर देखरेख करणारी वेबसाइट ‘फ्लायटरडार २४ डॉट कॉम’च्या आकडेवारीनुसार ३५०हून अधिक उड्डाणे विलंबाने झाली. सर्व विमानांना सरासरी ४० मिनिटे उशीर होत होता.
विमानांना होत असलेला विलंब आणि विमानतळावर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचे व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम शनिवार, १२ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत जाणवत होता. (Chaos At Delhi Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community