मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 18 स्थानकांच्या परिसरात माय बाईक कंपनीच्या सायकल सेवेत आल्या आहेत. पेडल आधारित असलेल्या सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता लवकरच ई- सायकल उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माय बाईक कंपनीच्या अधिका-याने सांगितले.
( हेही वाचा: इंद्रायणी नदीतून वाहतेय गटारगंगा; नदीचे पाणी पिण्यास मनाई )
मेट्रो स्थानकावर किमान 10 सायकल उपलब्ध
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या स्थानकांबाहेर सायकल सेवा सुरु करण्यासाठी एमएमआरडीएने माय बाईक कंपनीसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत माय बाईक कंपनी प्रत्येक मेट्रो स्थानकावर किमान 10 सायकल उपलब्ध करुन देणार आहे. कंपनी लवकरच ई सायकल प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे. यानंतर आता कंपनी या सायकल मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यांत सुरु होणा-या स्थानकांबाहेर ठेवण्याचा विचार असल्याचे, कंपनीच्या अधिका-याने सांगितले.
Join Our WhatsApp Community