‘हे’ केले नाही तर शेतक-यांचे पेन्शन होणार बंद?

135

केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतक-यांना पेन्शन देण्यात येत आहे. पण हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केव्हायसी करणे गरजेचे असून तसे न केल्यास शेतक-यांचे पेन्शन बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

ई-केव्हायसी करण्याचे आवाहन

पात्र शेतक-यांनी हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केव्हायसी 31 ऑगस्टपर्यंत करणे बंधनकारक असून तसे न केल्यास 31 ऑगस्ट नंतर या योजनेंतर्गत पात्र शेतक-यांचे पेन्शन बुधवारपासून बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हयातीची माहिती आणि इतर विविध माहितीसह ई-केव्हायसी करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण आता ही मुदतवाढ वाढवण्यात आली असून 31 ऑगस्ट पर्यंत ई-केव्हायसी करता येणार आहे.

(हेही वाचाः आता ‘म्हाडा’चे अर्ज ‘या’ मोबाईल ॲपवरून भरता येणार!)

नाहीतर पेन्शनपासून रहावं लागणार वंचित

केंद्र सरकारच्या किसान पेन्शन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये पेन्शनच्या स्वरुपात देण्यात येतात. या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हयात असल्याची माहिती देणे बंधनकारक आहे. संबंधित कृषी विभागाकडे हे ई-केव्हायसी दाखल करण्यास सांगण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण न करणा-या शेतक-यांना पेन्शनपासून वंचित रहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.