वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी e-textile प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या e-textile प्रणालीचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी (२४ सप्टेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विरेंद्र सिंह, सचिव, वस्त्रोद्योग, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – IPL 2025 : कुठल्या खेळाडूंना कायम ठेवायचं ही चेन्नई फ्रँचाईजीची रणनीती ठरली, धोनीविषयी अजून गोंधळ)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याचे नवीन एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना यावेळी दिल्या.
(हेही वाचा – Book My Show : बुक माय शो ॲप का क्रॅश झालं?)
वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरीता end to end Process Automation करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे. ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ च्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातील सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत e-textile प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव विरेंद्र सिंह यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community