महिलांकडून येणा-या छेडछाडीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता महिलांसाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहेत. हे क्रमांक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाॅंच केले जाणार होते, पण प्रकृती बरी नसल्याने हा कार्यक्रम झाला नाही.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य
दिले जाणारे हे मोबाईल क्रमांक सामान्य पोलीस हेल्पलाईन क्रमांकांव्यतिरिक्त असणार आहेत आणि या क्रमांकाचा वापर महिलांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या प्रतिसादात सुधारणा करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या साकी नाका बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या निर्भया उपक्रमाचा हा एक भाग आहे.
हे क्रमांक सार्वजनिक करण्यात येणार
प्रत्येक पोलीस ठाण्याकडे आता स्वतःचा मोबाईल क्रमांक असणार आहे. महिलांना कोणत्याही प्रकारच्या छळाचा सामना करावा लागल्यास, पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी हा क्रमांक आहे. असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले. प्रत्येक पोलीस ठाण्याला दिलेले मोबाईल क्रमांक हे पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये आणि निर्भया व्हॅनमध्ये लावून ते सार्वजनिक करण्यात येणार आहेत.
तात्काळ होणार कारवाई
एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करुन, त्यात संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणा-या प्रमुख इमारतींना समाविष्ट करण्यात येणार आहे. महिलांवरील आधारित गुन्ह्यांची कोणतीही तक्रार असल्यास, या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर एक संदेश पाठवला तरी पोलीसांकडून लगेच त्यावर अॅक्शन घेतली जाणार आहे. तसेच, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या फेसबूक पेजवर हा मोबाईल क्रमांक दिला जाणार आहे.
( हेही वाचा : व्हीआयपी सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता महिला करणार..)
Join Our WhatsApp Community