अक्षय शिंदे हा एक विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती होता. छोट्या मुलींवर त्याने इतके अत्याचार केले की, मी सांगू शकत नाही. त्याने केलेल्या अत्याचाराबद्दल त्या मुलींनी घरच्यांना सांगितले. तो खूप वाईट होता. त्यावेळी बदलापूरच्या लोकांनी ९ तास रेल्वे रोखून धरल्या होत्या. इतका राग लोकांमध्ये होता. त्याला पकडा आणि फाशी द्या, अशी मागणी केली जात होती. आता विरोधक म्हणताहेत अक्षय शिंदेला (Akshay Shinde) का मारले?, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मविआच्या नेत्यांना फटकारले.
(हेही वाचा दहशतवाद हा जागतिक शांततेसाठी गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून PM Narendra Modi यांचा इशारा)
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे महायुती सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अक्षय शिंदे प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले.
काय म्हणाले अजित पवार?
आम्ही त्या मुलींची वैद्यकीय चाचणी केली. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. या घटनेची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी विरोधी पक्षातील नेते म्हणत होते की, राज्यात महिला सुरक्षित नाही. आता विरोधक बोलताहेत की त्याला का मारले? आधी म्हणत होते, अक्षय शिंदेला (Akshay Shinde) फाशी द्या. असं कसं चालेल? आपल्या घरातील महिलांना कोण असुरक्षित ठेवेल? हे पूर्ण राज्य आमचे घर आहे. त्याला पकडण्यात आले. चौकशीसाठी त्याला पोलीस तुरूंगातून घेऊन जात होते, असे अजित पवार म्हणाले. आरोपीने जवळ बसलेल्या पोलिसाची रिव्हॉल्व्हर घेतली आणि तीन गोळ्या झाडल्या. एका पोलिसाला गोळी लागली. त्या विकृत माणसाने गोळ्या झाडल्यामुळे पोलिसांनी प्रत्युरात कारवाई केली. त्यात तो मारला गेला. या घटनेचे मी समर्थन करत नाही. याची चौकशी होईल. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले. लहान मुलींवर अत्याचार करताना त्याला लाज वाटली नाही, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community