पाकिस्तान आणि तिबेटमध्ये आज (Earthquake) मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 तर तिबेटमध्ये 5.0 इतकी नोंदवण्यात आली, तर पापुआ न्यू गिनीमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 इतकी होती.
पहाटे गाढ झोपेत असताना अचानक भूकंपामुळे जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. घरातील भांड्याची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक दचकून उठले. भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकं घाबरून घरातून बाहेर पडले होते. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
(हेही वाचा – Unseasonal Rain : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’ – मुख्यमंत्री )
कोणता भूकंप धोकादायक…
भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तर, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप सामान्य ते धोकादायक मानला जातो. या प्रमाणात, 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपांना सूक्ष्म भूकंप म्हणतात जे बहुतेक जाणवत नाहीत. ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community