Team India Victory Parade मध्ये चोरांची कमाई; शेकडो मोबाइल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल

86
Team India Victory Parade मध्ये चोरांची कमाई; शेकडो मोबाइल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल

मरीन ड्राईव्ह येथे टी-२० विश्वचषकातील विजय यात्रेत चोरट्यांची मात्र कमाई झाली. गर्दीमध्ये मिसळलेल्या चोरट्यांनी शेकडो क्रिकेटप्रेमींचे मोबाइल फोन चोरल्याचा प्रकार शुक्रवारी (५ जुलै) उघडकीस आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८४ मोबाइल फोन गहाळ आणि चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत तक्रारींचा ओघ सुरूच होता, तर अनेकांनी ऑनलाइन तक्रारी दिलेल्या असल्याची महिती एका पोलीस अधिकाऱ्यांने दिली. रात्री उशिरा मरीन ड्राईव्ह येथील गर्दी ओसरल्यावर त्या ठिकाणी चप्पल बुटांचा ढीग जमा झाला होता. (Team India Victory Parade)

भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्याचा आनंदोत्सव गुरूवारी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. भारतीय क्रिकेट टीम विश्वचषक घेऊन गुरूवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर नरीमन पॉइंट येथून ओपन बसमधून नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजय यात्रा काढण्यात आली होती. या विजय उत्सवात सामील होण्यासाठी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी मरीन ड्राईव्ह येथे दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या क्रिकेटप्रेमींना आवरता आवरता मुंबई पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात मोबाइल फोन चोरट्यांनी अनेकांच्या खिशातील मोबाइल फोन चोरी केले. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अनेकांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती, तर अनेकांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केलेल्या आहेत. (Team India Victory Parade)

(हेही पहा – Legislative Council : शिवीगाळ करूनही दानवेंची माफी नाहीच!)

मोबाइल फोन चोरी झाल्याच्या इतक्या तक्रारी

शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ऑनलाइन आणि प्रत्यक्षात हजर राहून दिलेल्या तक्रारीत ८४ मोबाइल फोन गहाळ आणि चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी महिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी गहाळ आणि चोरीच्या तक्रारी दाखल करून मोबाइल फोनच्या शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज, वृत्त वाहिनीचे फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन ड्राईव्ह येथे अपेक्षेपेक्षा चार पटीने क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. (Team India Victory Parade)

जवळपास ३ लाख लोक या ठिकाणी दाखल झाल्यामुळे येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना कठीण झाले होते. येथील एकूण परिस्थिती पहाता चेंगराचेंगरी होते की अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच अनेक जण भोवळ येऊन कोसळले होते. पोलिसांनी त्यांना खांद्यावरून रुग्णालयात पोहचवले होते. अनेकजण लहान मुलांना घेऊन आले होते, गर्दीत मुलांचे हात सुटल्याने जवळपास डझनभर मुले हरवली होती. पोलिसांनी तात्काळ मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. विजययात्रा रात्री उशिरा संपल्यानंतर हळूहळू मरीन ड्राईव्ह येथील गर्दी ओसरली होती. या परिसरात हजारोंच्या संख्येने लोकांचे चप्पल-बुट जागोजागी पसरले होते. मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी येथील परिसर स्वच्छ करून पाच जीप भरून चप्पल बुटांचा खच जमा केल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. (Team India Victory Parade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.