
दिल्लीत (Delhi NCR) सोमवारी (17 फेब्रु.) पहाटेच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake in Delhi NCR) जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर आली. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजली गेली, त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीला जोरदार धक्के जाणवले. (Earthquake in Delhi NCR)
An earthquake with a magnitude of 4.0 on the Richter Scale hit New Delhi at 05:36:55 IST today
(Source – National Center for Seismology) pic.twitter.com/KXIw8qRO6T
— ANI (@ANI) February 17, 2025
हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला. अनेक वर्षानंतर भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या जवळ होते. दिल्ली हे भूकंपाचे केंद्र असल्याने येथील लोकांना बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake in Delhi NCR)
काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवू लागली. पहाटे ५.३६ वाजता हा भूकंप झाल्याची माहिती आहे, त्यामुळे लोकांची झोप उडाली. भूकंपाचे हादरे बसताच लोकांमध्ये घबराट पसरली आणि खबरदारी म्हणून ते तात्काळ घराबाहेर पडले. दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. (Earthquake in Delhi NCR)
हेही वाचा-Nitin Gadkari यांचे कुटुंबासह पवित्र संगमात स्नान; म्हणाले “महाकुंभ महापर्व हा… “
सध्या कुठूनही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या झोन IV मध्ये येते, ज्यामुळे येथे मध्यम ते तीव्र भूकंपाचा धोका असतो. दिल्ली एनसीआरमध्ये वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र या तीव्रतेचे धक्के बऱ्याच दिवसांनी जाणवले आहेत. (Earthquake in Delhi NCR)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community