दिल्ली एनसीआरसह जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये २०० किमी खाली होता.
( हेही वाचा : आता देशभरात हवाई मार्गाने प्रत्यारोपणासाठी अवयव पोहोचवणे होणार अधिक सोपे)
गुरूवारी संध्याकाळी ७ वाजून ५६ मिनिटांनी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या भूकंपाच्या धक्क्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत नववर्षात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Earthquake tremors felt in Delhi and adjacent areas. pic.twitter.com/vm0omiDObG
— ANI (@ANI) January 5, 2023