भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरलं; नागरिक भयभीत

97

पुन्हा एकदा पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 3.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिक भयभीत झाले आहेत.

पालघरमध्ये बुधवारी पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणावला आहे. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

( हेही वाचा: एकविरा आईच्या दारी, हलाल मांसाची विक्री )

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूंकपाच्या हाद-यांचे सत्र सुरुच असून हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवाने आजपर्यंत या भूंकपाच्या हाद-यांमुळे मोठी जीवितहानी झाली नसली तरी सतत बसणा-या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.