उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे ३ धक्के! जमीन हादरल्याने नागरिक भयभीत

183

उत्तकाशीमध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. जमीन हादल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भारतीय हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल होती. रात्री १२.४० वाजता उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये पहिला भूकंपाचा हादरा बसला.

( हेही वाचा : बांगलादेशमधील ऑक्सिजन प्रकल्पात स्फोट! ६ जणांचा मृत्यू, ३० जखमी)

भूकंपाचा हादरा बसल्यामुळे अनेक लोकांनी घरातून पळ काढला. परंतु सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचा पहिला धक्का १२.४०, दुसरा धक्का १२.४५ तर तिसरा झटका १ वाजून १ मिनिटांनी बसला.

अचानक खिडकी आणि दरवाजाचा आवाज येऊ लागला. किचनमधील भांडी आदळत होती. एकानंतर एक असे तीनवेळा भूकंपाचे हादरे बसल्याने सर्व लोक घराबाहेर शांत बसून होती अशी माहिती तेथीस स्थानिकांनी दिली आहे.

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार रात्री १२.४५ वाजताच्या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केलचा होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.