कोल्हापूरमध्ये (Earthquake) आज म्हणजेच बुधवार १६ ऑगस्ट रोजी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात ३.४ रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ ५ किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले.
(हेही वाचा – ICC ODI Cricket World Cup 2023 : भारत-पाक सामन्याची तिकिटं कधी, कुठे मिळणार?)
कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात देखील भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले आहेत.
सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. पहाटे ६:४० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्णाण झाले होते.
Maharashtra: Earthquake of magnitude 3.4 strikes Kolhapur
Read @ANI Story | https://t.co/KLBj3RnA5k#Maharashtra #earthquake #Kolhapur pic.twitter.com/nXRaROkqyc
— ANI Digital (@ani_digital) August 16, 2023
कोयना धरणापासून २० किलोमीटर अंतरावर या भूकंप धक्के जाणवले. सुदैवाने याही भूकंपामुळे (Earthquake) कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community