सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे सौम्य (Earthquake) झटके जाणवले आहेत. रविवार ७ मे रोजी पहाटे ३.५३ वाजेच्या सुमारास हे झटके जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपात (Earthquake) सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली आहे.
या भूकंपामुळे (Earthquake) धरणाला कोणत्याही प्रकारे धोका पोहचला नसल्याची माहिती तेथील धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
(हेही वाचा – Blood Pressure : सतत फोनवर बोलता? जरा दमानं! होईल रक्तदाबाचा त्रास)
भूकंपाचा सौम्य धक्का
रविवारी पहाटे ३.५३ मिनिटांनी कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य (Earthquake) धक्का बसला असून पाटण आणि कोयना परिसरात याचे सौम्य झटके जाणवले. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहचलेला नाही. तसेच पाटण तालुक्यात अथवा कोयना परिसरारात कोठेही पडझड झालेली नाही.
हेही पहा –
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू हा कोयनानगरपासून २४ किलोमीटर तर कोयना धरणापासून उत्तरेला ५ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीखाली ३० किलोमीटर इतकी होती. भूकंपाचा हा सौम्य धक्का केवळ कोयना परिसरातच जाणवला. भूकंपामुळे घराला तडे अथवा पडझड झाली नसली तरी नागरिकांमध्ये थोडी भीती पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community