वसमत तालुक्यात बुधवारी (८ नोव्हेंबर) सर्व गाव झोपेत असताना रात्री १२:४ मिनिटांनी भूकंपाचा जोराचा धक्का जाणवला.
वसमत तालुक्यातील पांगरा ( शिंदे) या गावात ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी जोराचा (Hingoli Earthquake) भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा आवाज झाला पण नोंद झाली नाही असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी सांगितले.
वसमत तालुक्यात (Hingoli Earthquake) भूकंपाचा जोराचा धक्का जाणवताच सर्व गावाला जाग आली आणि काही वेळातच सर्व नागरीक रस्त्यावर धावले. या भूकंपाचे केंद्र पांगरा शिंदे आहे असे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – Manilal H. Patel : महान गुजराती साहित्यिक)
पांगरा गावाबरोबरच कुरुंदा,पार्डी, कोठारी, सोमठाणा, राजवाडी,सिरळी, कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिंदे पांगरा, वापटी, राजवाडी, आंबा, चोंडी स्टेशन, वरताळा आदी ठिकाणी एकाचवेळी भूकंपाचा (Hingoli Earthquake) धक्का जाणवला आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी येथे भूकंपाचा धक्का जाणवला होता.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community