Earthquake : अंदमान बेटांवर पुन्हा बसले भूकंपाचे धक्के

136
Earthquake : अंदमान बेटांवर पुन्हा बसले भूकंपाचे धक्के

अंदमान बेटावर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (३ ऑगस्ट) गुरुवारी सकाळी (Earthquake) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. सुदैवाने यामध्ये आत्तापर्यंत कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झालेली नाही.

याठिकाणी बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी ५:४० वाजता अंदमान बेटावर भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. या भुकंपाची तीव्रता ५.० एवढी होती. यापूर्वी २९ जुलै रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ५.८ मॅग्नीट्युड रिश्टर स्केल इतकी दर्शवली होती. मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनीटांनी झालेला हा भूकंप पोर्ट ब्लेअर पासून दक्षिण पूर्वेला १२६ किलोमीटर झाल्याची माहीती एनसीएसने ट्वीट करत दिली होती.

(हेही वाचा – Tomato Price Hike : दिल्लीत टोमॅटोने गाठला विक्रमी दर, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत ‘इतके’ रुपये)

असा होतो भूकंप

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. आता हा ५० किलोमीटर जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग ७ टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे. या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा त्या एकमेकांवर आदळतात. काही वेळा या प्लेट्सही तुटतात. त्यांच्या धडकेमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे परिसरात एकच (Earthquake) धक्के जाणवतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.