गुजरातच्या सीमावरती भागाला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा आणि मोठा कडवण परिसरात गेल्या 3 ऑक्टो. पासून भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवत आहेत. तर भूगर्भातूनही आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
४ ऑक्टो. च्या रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मोठा कळवण परिसरात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले असून याची नोंद गांधीनगर येथील भूकंपमापन (Earthquake) केंद्रात झाली आहे. भूकंपामुळे हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
भूकंप कसा होतो?
जेव्हा पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर खरडतात किंवा एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतो. यामुळे जमीन हिंसकपणे हादरते आणि कधी कधी भूस्खलन, पूर आणि त्सुनामी देखील होऊ शकते. पण प्रत्येक भूकंप धोकादायक नसतो. (Earthquake)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community