शुक्रवारी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टल इतक्या तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला, त्यामुळे उंच इमारती जमीनदोस्त झाल्या, या भूकंपात १ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी शनिवार, २९ मार्चलाही पुन्हा म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के बसले. ४.७ रिश्टल इतक्या तीव्रतेचा भूकंप नोंदवला.
(हेही वाचा औरंगजेबाच्या कबरीच्या वादात Dhirendra Krishna Shastri यांचे विधान; म्हणाले, औरंगजेबाने देश…)
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये शनिवारी, दुपारी २.५० वाजता पुन्हा भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शनिवारीही म्यानमारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला. शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र मंडालेजवळ होते. यामुळे बँकॉक, थायलंड आणि म्यानमारमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथे अनेक इमारती कोसळल्या.
Join Our WhatsApp Community