पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu), दापचरी (Dapchari) परिसरात सोमवारी पहाटे ३ वेळा भूकंपाचे घक्के (Palghar Earthquake) जाणवले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के बसताच लोक घरदार सोडून रस्त्यावर आले. (Palghar Earthquake)
हेही वाचा-Eknath Shinde यांना धमकी देणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरु
याआधी पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसरात ३१ डिसें. २०२४ रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत असून भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Palghar Earthquake)
हेही वाचा-मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही, सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा: Bombay High Court
नववर्षाच्या सुरूवातीलाच हा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पालघर जिल्ह्यात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. सतत बसणाऱ्या या धक्क्यांमुळे काहींच्या घरातील भिंतींना तडे गेले आहेत. याआधीही ऑगस्ट २०२४ आणि ऑक्टो. २०२४ मध्ये डहाणू तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले होते. (Palghar Earthquake)
हेही पहा-