Solapur जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; जमीन हादरली, जाणून घ्या तीव्रता किती होती?

112
Solapur जिल्ह्यात ३ एप्रिलला सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (National Seismological Center) एक्सवर पोस्ट करत दिली आहे. सांगोला (Sangola) येथे भूकंपाचे (Earthquake) केंद्रबिंदू असल्याची माहिती असून पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. दरम्यान, या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी म्यानमार येथे मोठ्या तीव्रतेची भूकंप झाला असून सुमारे ३ हजार जणांचा बळी गेला आहे. (Solapur)
हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झाला आहे. याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यामध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. १९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंप झाला आहे. सांगोला तालुक्याच्या शेजारी असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातही हा भूकंप जाणवल्याचे सांगितले जात आहे. सांगोला हे भूकंपाचे केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार (Manisha Kumbhar) यांनी सांगितले.

(हेही वाचा – आता ‘पितांबरी’ची उत्पादने होणार ओम प्रमाणित; Pitambari चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मोठी घोषणा)

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, भारताचा सुमारे ५९ टक्के भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. भारतातील भूकंप क्षेत्रे चार भागात विभागली आहेत. त्यांना झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन-५ अशी नावे देण्यात आली आहेत. झोन-५ हा सर्वात संवेदनशील भाग आहे. राजधानी दिल्ली झोन-४ मध्ये येते, जो एक चिंताजनक झोन आहे. याचा अर्थ असा की येथे ७ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप देखील येऊ शकतात. जर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७ असेल तर विनाश निश्चित मानला जातो.भूकंप झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.