महाराष्ट्र – तेलंगणा सीमेजवळ (Maharashtra – Telangana border) भूकंपाचा (Earthquake) जोरदार झटका जाणवला आहे. भूकंपाचे धक्के चंद्रपूर (Chandrapur) पर्यंत जाणवले आहेत. तेलंगाणा जवळ 5.0 तीव्रतेचा झटका जाणवला, असे सांगितले जात आहे. चंद्रपूर शहरात बुधवार ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना हे धक्के जाणवले. भूकंपामुळे घरांच्या खिडक्यांचा आवाज येत होता. (Earthquake)
An earthquake with a magnitude of 5.3 on the Richter Scale hit Mulugu, Telangana at 7:27 AM today: National Center for Seismology pic.twitter.com/PKq7BnFxke
— ANI (@ANI) December 4, 2024
हेही वाचा- Weather Update: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी; IMD ने दिला कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
नजीकच्या तेलंगणा राज्यातील मुलुंगमध्ये मोठा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगणामध्ये तसेच चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अनेक लोकांनी धक्के जाणवले असे सांगितले. चंद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात देखील अनेकांनी धक्के लागल्याने घराबाहेर पडले. (Earthquake)
हेही वाचा- भारतात Drug Smuggling साठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपकरणांचा वापर; पोलीस करणार सखोल तपास
याबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. असं आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या भूकंपाचे पडसाद अनेक ठिकाणी जाणवले. तेलंगणात भूकंपाचे तीव्र धक्के पाहता संबंधित विभाग मदतकार्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून होत आहे. (Earthquake)
हेही वाचा- World Chess Championship : गुकेशची विजयाची संधी लिरेनने भक्कम बचावाने घालवली
गडचिरोली, अहेरी, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी या तालुक्यांत घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. घरातील फ्रीज, भांडी तसेच खिडक्यांच्या काचाही हलल्या. नागरिकांनी घराबाहेर पडून एकमेकांना विचारणा केली. या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीची माहिती घेत आहे. (Earthquake)
नागरिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क राहण्याचा आणि गर्दीच्या किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरातून आणि अपार्टमेंटमधून बाहेर पळू लागले. काही वेळ जमीन हादरली, जी त्यांना जाणवली. धक्क्याने खुर्च्यांवर बसलेले अनेक जण खाली पडले. (Earthquake)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community