हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के; 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 22 किमी पूर्वेला पहाटे 5:17 वाजता 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

यापूर्वी 5 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवला होते. जम्मू आणि कश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. तेथे 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात होते. तसेच नववर्षाच्या पहिल्या दिवशीही देशात वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

( हेही वाचा: पुणे रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क )

देशाचा 59 टक्के भाग भूकंपाच्या धोक्याचे क्षेत्र

भारतीय मानक ब्युरोने संपूर्ण देशाची 5 भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. देशाचा 59 टक्के भाग भूकंपाच्या धोक्याचे क्षेत्र आहे. पाचवा झोन हा देशातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय क्षेत्र मानले जातो. या झोनमध्ये येणारी राज्ये आणि भागात भूकंपामुळे विध्वंसाची शक्यता सर्वाधिक आहे. या पाचव्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातमधील कच्छ, उत्तर बिहारचा भाग, भारतातील सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here