नेपाळची (Nepal Earthquake) राजधानी काठमांडूमध्ये मंगळवारी सकाळी 6 वाजून 35 मिनिटाला शक्तिशाली असा 7.1-रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला. या भूकंपाच्या धक्क्यानं माऊंट एव्हरेस्टजवळील (Mount Everest) दुर्गम हिमालयीन प्रदेशाला मोठे हादरले बसले आहेत. या भूकंपानंतर त्याचा परिणाम भारतातील बिहार (Bihar Earthquake) आणि आसाममध्ये (Bihar earthquake) दिसून आला आहे. (Earthquake)
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (US Geological Survey) माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील लोबुचेपासून 93 किलोमीटर (57 मैल) चीनमधील तिबेटच्या पर्वतीय सीमेवर आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे काठमांडू आणि तेथून 200 किलोमीटरहून अधिक इमारती हादरल्या आहेत. भूकंप सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर बसल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.
बिहारमध्ये भूकंपाचे धक्के-
बिहारमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडले. अचानक सकाळी झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहारची राजधानी पाटणाशिवाय पूर्णिया, मधुबनी, शिवहार, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, मोतिहारी आणि सिवानसह या जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला. बिहारच्या एकूण जिल्ह्यापैकी निम्म्या जिल्ह्यात सकाळी 6.35 ते 6.37 च्या दरम्यान लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
(हेही वाचा – नागपुरातील दोन लहान मुलांना HMPV ची लागण; महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव)
भूकंपामागे काय आहे वैज्ञानिक कारण?
पृथ्वीच्या पोटात 7 टेक्टोनिक प्लेट्स फिरत राहतात. या प्लेट्सच्या कधी-कधी हालचाली वाढून त्या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. तेव्हा प्लेट्स एकमेकांपासून सरकतात अथवा दूर जातात. त्यामुळे जमिनीला धक्के बसतो, यालाच आपण भूकंप म्हणतो. साधारणत: रिश्टर स्केलवर भूकंप 1 ते 9 पर्यंत असू शकतात.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community