कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरचा (Janhvi Gadkar) समावेश असलेल्या ईस्टर्न फ्रीवेवरील 9 वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या प्रकरणात सरकारने वेगळी मागणी केली आहे. 2015 मध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी तत्कालीन भारतीय दंड संहितेअंतर्गत जान्हवी गडकरवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (Eastern Freeway Drunk Driving) त्यामुळे जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. जान्हवी गडकरवर सदोष मनुष्यवधासह हत्येचाही आरोप लावणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.
(हेही वाचा – महापालिकेचे धोरण मान्य करावे लागेल; SC च्या आदेशानंतर Central, Western Railway अवाढव्य Hoardings हटविणार)
काय आहे प्रकरण ?
2015 मध्ये वकील जान्हवी गडकर या मुंबईत गाडी चालवत असताना तिच्या ऑडी कारने टॅक्सीला टक्कर दिली होती. मद्यधुंद अवस्थेत असताना चुकीच्या मार्गिकेतून ऑडी कार चालवत जान्हवी गडकरने टॅक्सीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात टॅक्सी चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या हे प्रकरण सत्र न्यायालयात आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. सदोष मनुष्यवधासह हत्येचाही आरोप जान्हवी गडकरवर लावणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तसेच आपण करत असलेल्या कृतीची जान्हवीला पूर्ण कल्पना होती, त्यामुळेच हत्येचा आरोप लावत असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.
जान्हवी गडकर कॉर्पोरेट वकील असून सध्या जामीनावर बाहेर आहे. कंपनीला मिळालेल्या एका मोठ्या प्रोजेक्टची पार्टी करून रात्री उशिरा दक्षिण मुंबईहून चेंबूर येथील निवासस्थानी परतत असताना फ्रि वेवर जान्हवी गडकरच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. (Eastern Freeway Drunk Driving)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community