Eastern Freeway : पूर्वमुक्त मार्गावरून आता थेट पोहोचा ग्रँटरोड नाना चौकात

Eastern Freeway : इस्टर्न फ्री वे वरून सहा ते सात मिनिटांमध्ये पोहोचता येईल ग्रँटरोडला

712
Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच
Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच

पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला प्रवास करता यावा याकरता महापालिकेच्यावतीने (Municipal Corporation) पूर्व मुक्त मार्ग (ऑरेंज गेट) पासून ते ग्रँटरोड नाना चौक या भागापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या उड्डाणपुलाचा मार्ग हा पठ्ठे बापुराव मार्गावरून जात असल्याने अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीमुळे प्रकल्प कामात खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने याच्या आराखड्यात बदल करावा लागत आहे. त्यामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचे बोलले जात असून यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत जे कुमार आणि आरपीएस या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह तब्बल ३००३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Eastern Freeway)

(हेही वाचा- Underground Waste Bin : घाटकोपरमध्ये बसवल्या जाणार सहा भूमिगत कचरा पेट्या)

 कशी मिळवली ४८ तासांमध्ये मंजुरी

पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामांसाठी २० जानेवारी २०२४ रोजी निविदा मागवली होती. त्यानंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी निविदा पूर्व बैठक पार पडली. त्यानंतर निविदेतील दोन पाकीट १७ फेब्रुवारी रोजी उघडण्यात आले. आणि अंतिम पाकीट हे २९ फेब्रुवारी २०२४ रोजी उघडण्यात आले. या निविदेत सर्वांत कमी बोली लावून जे कुमार-आरपीएस या संयुक्त भागीदारातील कंपनी पात्र ठरली आहे. या कामांसाठी विविध करांसह ३००३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २९ फेब्रुवारीला अंतिम निविदा खुली करण्यात आली आणि १ मार्च रोजी खातेप्रमुख, उपायुक्त (पायाभूत सुविधा), अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आदींसह आयुक्तांची प्रशासकीय मान्यता  घेऊन स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सुट्टीच्या दिवशी म्हणजे २ मार्च रोजी पाठवून प्रशासकांची मंजुरी घेत त्याच दिवशी कार्यादेश देण्याची किमया साधली आहे. (Eastern Freeway)

का वाढला खर्च

दिवाबत्ती, सीसीटिव्ही, रोड चिन्हे, रोड फर्निचर, आवाज रोधक घटक, नासधुस होणाऱ्या रस्त्यांचे पुनर्बांधकाम, अस्तित्वातील पुलाचे मजबुतीकरण, पुलाची आरोग्य यंत्रणा, पर्यावरण व्यवस्थापन अंमलबजावणी, देखभाल तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या सुचनेनुसार संकल्प रचना आणि आराखड्यात  बदल करण्यात आल्याने  या खर्चात वाढ झाल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. (Eastern Freeway)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : मतदार सहायता कक्षाच्या मदतीने मतदान प्रक्रिया सुलभ करण्याचा निवडणुक आयोगाचा प्रयत्न – शर्मा)

अवघ्या ६ ते ७ मिनिटांमध्ये गाठाल अंतर

पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) (Eastern Freeway) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक या अंतरासाठी सध्याच्या स्थितीत ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. पण या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बांधकामामुळे हे अंतर ६ ते ७ मिनिटांचे होणार आहे. (Eastern Freeway)

उड्डाणपुलाचा मार्ग असेल असा

पूर्वमुक्त मार्ग ऑरेंज  गेटपासून जे राठोड मार्ग, हँकॉक पूल, रामचंद्र भट्ट मार्ग, जे. जे. उड्डाणपूल, एम.एस. अली मार्ग व पठ्ठे बापुराव मार्ग (Eastern Freeway)

(हेही वाचा- Chhatrapati Shivaji Maharaj : छ. संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे गुरुवारी होणार अनावरण)

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

उड्डाणपुलाची रुंदी : ४ मीटर ते १२ मीटर

उड्डाणपुलाचे बांधकाम : आरसीसी पाईल फाऊंडेशन

 हँकॉक पूल येथील मध्य रेल्वे मार्ग ओलांडण्याकरता पुलाचे बांधकाम : केबल स्टेड पूल

हार्बर मार्गावरील रेल्वेपूल ओलांडण्याकरता : बो स्ट्रिंग पध्दतीचा पोलादी पूल अधिक आरसीसी डेक स्लॅब

पठ्ठे बापुराव मार्गावरील पुलाचे बांधकाम :  १०० मीटर लांबीचा स्टील डेक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.