सध्या लोकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ecofriendly Geneshotsav) साजरा करण्याकडे कल वाढत चालला आहे. हाच असा गणेशोत्सव साजरा करण्याची सुरवात होते ती पर्यावरणपूरक गणेशमूर्तीपासून. ‘पीओपी’च्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, गणेश सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन दरवर्षी प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून केले जाते.
त्यानुसार अनेकजण शाडूच्या मूर्तींना पसंती देताना दिसत आहेत. मात्र, पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींचे उत्पादन, मागणी व खरेदीचा कल पाहता; यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती विकत घेण्याकडेच गणेशभक्तांची संख्या तुलनेने जास्त आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे.
त्यामुळे ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने सजू लागली आहेत. आपल्या आवडीची मूर्ती बुक करण्यासाठी भक्तांचीही लगबग सुरू झाली आहे. पण शहरातील मूर्ती विक्रेत्यांमध्ये ‘पीओपी’च्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या पाहता शाडूच्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या अगदीच कमी आहे.
(हेही वाचा : दिवाळखोरीतून बाहेर पाडण्यासाठी Pakistan विकणार सरकारी कंपन्या)
पीओपीच्या तुलनेत या मूर्तीचे उत्पादन कष्टाचे व खर्चिक आहे
शाडू मातीच्या मूर्तींबाबत नागरिकांमध्ये अद्याप पुरेशी जागरूकता नाही. अनेकदा विक्रेते शाडू मातीच्या मूर्ती म्हणून पीओपीच्या मूर्तींची विक्री करतात. शाडूच्या मूर्ती महाग असल्याने अनेकदा नागरिकांचे तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी नसते. त्यामुळे नागरिकांचा कल पीओपीच्या मूर्तींकडे जास्त असतो, असे मूर्तिकारांनी सांगितले.पीओपीच्या तुलनेत शाडू मातीची मूर्ती घडविण्यासाठी अधिक वेळ लागतो. ही माती गुजरातच्या नर्मदा खोऱ्यातून आणली जाते. साहजिकच पीओपीच्या तुलनेत या मूर्तीचे उत्पादन कष्टाचे व खर्चिक आहे.त्यामुळे या मूर्ती महाग असल्याचे मूर्तिकार सांगतात. त्यामुळे शाडू मातीच्या अगदी पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यासाठी अनेकदा प्रशासन केवळ चर्चा करते. मात्र, घोषणा होत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community