Economics Nobel Prize : अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर

गोल्डिन यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे

128
Economics Nobel Prize : अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर
Economics Nobel Prize : अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर

अर्थशास्त्रातील (Economics Nobel Prize) नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसकडून त्यांची निवड करण्यात आली आहे.

गोल्डिन यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या National Bureau of Economic Research (NBER) च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या.

(हेही वाचा – Cabinet Decision : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात ‘लेक लाडकी’ योजना )

अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डिन ओळखल्या जातात. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका क्लॉडिया गोल्डिन यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी २०२३ सालासाठीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. १० दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे ९ लाख ७ हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.