अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात गुरुवारी अर्थसंकल्प विश्लेषण

174

राज्यसभेचे माजी सदस्य, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे अर्थसंकल्प विश्लेषण गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्थसंकल्पाचे विश्लेषण स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्यावतीने आयोजित केले जाते, या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, शिवाजी पार्क येथील मादाम कामा सभागृह क्रमांक २ येथे हे व्याख्यान (केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण) होत आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूबवरही त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण गुरुवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.