अंमलबजावणी संचालनालायाने (ED Raid) गुजरातमधील वलसाड आणि दमण येथे केलेल्या छापेमारीत १.६२ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. यामध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही कारवाई (ED Raid) गँगस्टर सुरेश जगुभाई पटेल व त्याच्या साथीदारांवर करण्यात आली.
गँगस्टर सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या निवासी आणि व्यावसायिक परिसरांच्या झडतीदरम्यान, ईडीने (ED Raid) १०० हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. यामध्ये कंपन्या, फर्म आणि आस्थापना यांच्याशी झालेल्या व्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रांचा समावेश आहे.
(हेही वाचा – INDvsPAK Football Match : फुटबॉलच्या मैदानात वाद, भारतीय कोचसोबत भिडले पाकिस्तानचे खेळाडू)
तसेच डिजिटल पुराव्यांशिवाय तीन बँक लॉकर्स देखील आढळून आले. ईडीच्या (ED Raid) पथकाने आरोपी सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या ९ निवासी आणि व्यावसायिक परिसरांची झडती घेतली. गुजरातमधील या छापेमारीत २ हजारांच्या नोटांचा एवढा मोठा साठा सापडल्याने सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम आहे.
रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि त्या बदलण्याची मुदत दिली आहे. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावने देणे बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community