ED चे मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे; वॉशिंग मशीनमध्ये लपवलेले पैसे 

723

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेमा प्रकरणात मॅक्रोनियन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला, संजय गोस्वामी आणि त्यांच्या इतर कंपन्यांवर छापे टाकले. या छापेमारीत 2.54 कोटी रुपये जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, जप्त केलेली रक्कम चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवण्यात आली होती. या छापेमारीत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

(हेही वाचा Lok Sabha Election Campaign: ‘गिफ्ट आणू नका, पण मोदींना मत द्या’, लग्नपत्रिकेतून केलेल्या अनोख्या प्रचाराची सोशल मिडियावर चर्चा)

ईडीने (ED) ज्या कंपन्यांवर छापे टाकले, त्यात लक्ष्मीटन मेरीटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टीवर्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एमएस भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. यासोबतच, कंपन्यांचे संचालक आणि भागीदार संदीप गर्ग आणि विनोद केडिया यांच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या संस्था मोठ्या प्रमाणावर भारताबाहेर परकीय चलन पाठवत असल्याची माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे. हे परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन आहे. गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूर आणि हॉरायझन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर, या दोन्ही परदेशी संस्था अँथनी डी सिल्वाद्वारे व्यवस्थापित केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. ईडीने 47 बँक खाती गोठवलीशेल कंपन्यांच्या मदतीने बनावट मालवाहतूक आणि इतर कामांच्या नावाखाली सिंगापूरस्थित संस्थांना 1800 कोटी रुपये दिल्याचे उघड झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.