शुक्रवार, 12 जानेवारी रोजी सकाळी ईडीने पश्चिम बंगालचे (West Bengal) मंत्री सुजित बोस (Sujit Bose) आणि आमदार तापस रॉय (Tapas Roy) यांच्या घरावर छापा टाकला. महापालिका भरती घोटाळ्यासंदर्भात (Municipal Recruitment Scam) ईडीकडून कोलकाता (Kolkata) येथील तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांच्या घरांची झडती सुरु केली आहे. ही झडती दुपारपर्यंत सुरु होती.
ईडीने कोलकाताबाहेरील (Kolkata) ठिकाणीही छापे टाकले आहेत. चौकशीसाठी ईडी पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरी पोहोचली. पश्चिम बंगालचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) याविषयी म्हणाले की, हे सर्व चोर आहेत. पश्चिम बंगालच्या लोकांना त्यांना तुरुंगात पहायचे आहे.
तृणमूल काँग्रेसचे भाजपवर आरोप
तृणमूल कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष (Kunal Ghosh) म्हणाले, ”ईडी हे सर्व भाजपच्या आदेशानुसार करत आहे. राज्यात भाजपचा पराभव झाला असून तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) सामोरे जाण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एजन्सीचा गैरवापर होत आहे.”
बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) या यंत्रणांच्या माध्यमातून चालू होती. या काळात पालिकेच्या विविध नोकरभरतीतील अनियमितता संस्थांच्या निदर्शनास आली. शिक्षक भरती घोटाळ्याच्या (Teacher Recruitment Scam) प्रकरणी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी कोलकाता बिल्डर अयान सिलच्या कार्यालयावर छापा टाकला होता. (Municipal Recruitment Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community