आता चीनची MI मोबाईल कंपनी ईडीच्या रडारवर, काय होणार कारवाई?

सध्या चीनची MI कंपनी आता ईडीच्या रडारवर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी शाओमीचा (Xiaomi) 5 हजार 551 कोटींचा निधी आता ईडीकडून गोठवण्यात येणार आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने कंपनीविरुद्ध तपास केला होता. यानंतर कंपनीचा 5 हजार 551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रॉयल्टीच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  2014 मध्ये भारतीय मोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच वर्षापासून Xiaomi ने रॉयल्टीच्या नावाखाली कोट्यवधींची रक्कम परदेशात पाठवण्यास सुरुवात केली होती. मुळची चिनी कंपनी असणाऱ्या Xiaomi कंपनीकडून दोन अमेरिकेतील कंपन्यांनाही रॉयल्टी पाठवली जात होती. अमेरिकेतील ज्या कंपन्यांना Xiaomi कडून रॉयल्टी पाठवली जात होती, त्या दोन्ही कंपन्यांचा शाओमीच्या भारतातील कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. बनावट कागदपत्र तयार करून रॉयल्टीच्या नावाखाली शाओमीने ही रक्कम परदेशात पाठवल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चीनी मोबाईल निर्माता Xiaomi चे 5,551 कोटी रुपये जप्त करण्याच्या ईडीच्या निर्णयाला फेमा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. यापूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयाने ED च्या कारवाईविरुद्ध Xiaomi चे अपील फेटाळले होते. भारतात MI नावाने मोबाईल विकते. फेमा प्राधिकरणाच्या निर्णयाची माहिती देताना ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तपास यंत्रणेने योग्य कारवाई केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जप्तीची परवानगी देण्यात आली आहे.

(हेही वाचा मनोहर जोशींना हटवून उद्धव ठाकरेंना १९९५लाच व्हायचे होते मुख्यमंत्री, सुरेश नवलेंचा गौप्यस्फोट) 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here